नवीन इलेक्ट्रिक वाहन बाजारात दाखल; ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स नवीन फीचरसह लॉन्च

आता नवीन इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची वार्ता आहे.

    इलेक्ट्रिक वाहनांची मागणी देशभरामध्ये वाढली आहे. नवनवीन फीचरसह इलेक्ट्रिक वाहने बाजारामध्ये उपलब्ध होत आहेत. आता नवीन इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची वार्ता आहे. ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स या कंपनीने मुंबईमध्ये दोन अत्‍याधुनिक स्‍कूटर मॉडेल्‍स एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटर आणि ई२ लो-स्‍पीड स्‍कूटरच्‍या लाँचची घोषणा केल आहे. एसएनएपी हाय-स्‍पीड सकूटर एक्‍स-शोरूम मुंबई किंमत 79999 रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे, तर ई२ लो-स्‍पीड मॉडेलची किंमत 69999 रूपये आहे.

    एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटरमध्ये अत्याधुनिक फीचरसह अनेक नवीन फीचर आहेत. 2000 वॅट्सचे सर्वोच्‍च मोटर आऊटपुट आणि प्रतितास 60 किमीच्‍या टॉप स्पीडसह एसएनएपी अद्वितीय कार्यक्षमता व गतीशीलता देते. सिंगल चार्जमध्‍ये 105 किमीची रेंज आणि ४ तासांपेक्षा कमी चार्जिंग वेळेसह एसएनएपी सुलभ व विश्‍वासार्ह शहरी प्रवासाची खात्री देते. या स्‍कूटरमध्‍ये नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये आहेत, जसे वॉटरप्रूफ आयपी 67 मोटर, शक्तिशाली भारतीय चेसिस, तसेच एआयएस 156 सर्टिफाईड स्‍मार्ट बॅटरी (एलएफपी), जी अग्निरोधक, दीर्घकाळापर्यंत टिकाऊ आणि देखरेख करण्‍यास सोपी आहे. तसेच, एसएनएपीमध्‍ये अचूक बॅटरी लेव्‍हल मॉनिटरिंग आणि डिस्‍टन्‍स-टू-एम्‍प्‍टी कम्‍प्‍युटेशनसाठी सीएएन-सक्षम डिस्‍प्‍ले, तसेच सुधारित सोयीसुविधेसाठी क्रूझ कंट्रोल आहे.

    ई2 लो-स्‍पीड स्‍कूटर विश्‍वसनीयता व शाश्‍वततेचा शोध घेणाऱ्या शहरी राइडर्ससाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. 250 वॅट्सची मोटर शक्‍ती आणि प्रतितास 25 किमीच्‍या अधिकतम स्‍पीडसह ई2 सुरक्षितता व शाश्‍वततेला प्राधान्‍य देते. सिंगल चार्जमध्‍ये 70 किमीची रेंज आणि फक्‍त 4 तासांच्‍या चार्जिंग वेळेसह ई२ शहरामध्‍ये प्रवासासह पर्यावरणावर कमी परिणाम होण्‍याची खात्री देते.

    ओडिसी इलेक्ट्रिकचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी नेमिन वोरा म्‍हणाले, “ओडिसी इलेक्ट्रिकमध्‍ये आम्‍ही शाश्‍वत व नाविन्यपूर्ण सोल्‍यूशन्‍ससह इलेक्ट्रिक गतीशीलता लँडस्‍केपला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा प्रयत्‍न करतो, जे ग्राहकांना सक्षम करण्‍यासोबत हरित भविष्‍याप्रती योगदान देतात. एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटर आणि ई२ लो-स्‍पीड स्‍कूटरच्‍या लाँचसह आम्‍ही सर्वोत्तमता, शाश्‍वतता आणि ग्राहक समाधानाप्रती आमची अविरत कटिबद्धता दाखवत आहोत. आमचा विश्‍वास आहे की, या नवीन ऑफरिंग्‍ज भारतामध्‍ये आणि भारताबाहेर इलेक्ट्रिक दुचाकींसाठी नवीन मानक स्‍थापित करतील.