आता आसाममध्ये ऑलेक्ट्राच्या इलेक्ट्रिक बसेस धावणार; कंपनीकडे असणार ‘ही’ जबाबदारी

9 महिन्यांच्या कालावधीत बसेस वितरित केल्या जातील. आणि कंपनीकडे 5 वर्षांच्या कालावधीसाठी या बसेसच्या देखभालीसाठी जबाबदारी असेल. या 100 बसेसची अंदाजे किंमत 151 कोटी एवढी आहे.

  मुंबई : ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA) ला 100 इलेक्ट्रिक बसेससाठी (EV Buses) आसाम राज्य परिवहन महामंडळाकडून (Assam State Transport Corporation) मागणीपत्र प्राप्त झाले आहे. ईशान्येकडील राज्यांमधून मिळालेली ही पहिली ऑर्डर आहे. मंडळ या बसेस थेट विकत घेत आहे.

  9 महिन्यांच्या कालावधीत बसेस वितरित केल्या जातील. आणि कंपनीकडे 5 वर्षांच्या कालावधीसाठी या बसेसच्या देखभालीसाठी जबाबदारी असेल. या 100 बसेसची अंदाजे किंमत 151 कोटी एवढी आहे.

  “आम्हाला ईशान्येकडील राज्ये आणि आसाममधून पहिली ऑर्डर मिळाल्याने आनंद होत आहे. या बसेसच्या संचलनानंतर , आमच्या बसेस भारताच्या जवळ जवळ प्रत्येक कानाकोपऱ्यात धावतील. आतापर्यंत आमच्या बसेसनी 5 कोटी किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. यामुळे भारतीय रस्त्यावर होणारे कार्बन उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी झाले आहे.”

  – के व्ही प्रदीप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एएसटीसी

  ठळक वैशिष्ट्ये

  • उत्तर-पूर्व राज्यांकडून प्रथमच इ बसेसची मागणी
  • मागणीचे मूल्य रु. 151 कोटी.
  • पाच वर्षांसाठी देखभालीची जबाबदारी ऑलेक्ट्राकडे