आता आनंद द्विगुणित होणार! Maruti Suzuki लाँच करणार Flex Fuel इंजिनवाली कार, जाणून घ्या तुमचा काय होणार फायदा

ज्या गाड्या फ्लेक्स इंधनावर चालतील, त्या पेट्रोल (Petrol) आणि इथेनॉलच्या (Ethanol) मिश्रणावर चालतील. आता कंपन्यांना त्यांच्या कारच्या इंजिनमध्ये असे काही बदल करावे लागतील किंवा असे इंजिन बनवावे लागेल, जे फ्लेक्स इंधनावर चालू शकेल.

    नवी दिल्ली : Maruti Suzuki Flex Fuel Engine Powered Car Launch: काही दिवसांपूर्वी, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ऑटोमोबाईल कंपन्यांना स्पष्ट संदेश दिला होता की, त्यांनी लवकरच Flex Fuel Engine बनवण्यावर भर द्यावा, जेणेकरून पर्यावरण प्रदूषणालाही आळा बसेल आणि लोकांच्या खिशावर कमी ताण पडेल. आता तुमच्या मनात येत असेल की, हे फ्लेक्स इंधन आहे तरी काय आणि सरकार त्यासाठी आग्रह का धरत आहे? त्याच बरोबर हा प्रश्न देखील पडेल की, शेवटी जनतेला काय फायदा होईल आणि पर्यावरणासाठी त्याचा कसा फायदा होईल? आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, परंतु त्याआधी हे जाणून घ्या की मारुती सुझुकी लवकरच फ्लेक्स इंधन इंजिन कार लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे.

    तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही आहेत…

    आता एक एक करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची तर पहिला प्रश्न हा आहे की हे फ्लेक्स इंधन (What Is Flex Fuel) आहे तरी काय? आम्ही तुम्हाला सांगतो की, Flex fuel च्या नावावरूनच असे सूचित होते की याद्वारे चालवलेले इंजिन इंधनाच्या बाबतीत फ्लेक्सिबल असतील. म्हणजेच ज्या गाड्या फ्लेक्स इंधनावर चालतील, त्या पेट्रोल (Petrol) आणि इथेनॉलच्या (Ethanol) मिश्रणावर चालतील. आता कंपन्यांना त्यांच्या कारच्या इंजिनमध्ये असे काही बदल करावे लागतील किंवा असे इंजिन बनवावे लागेल, जे फ्लेक्स इंधनावर चालू शकेल. इथेनॉल उसापासून बनवले जात असल्याने अशा वेळी फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या गाड्या आल्या तर लोकांच्या खिशावर फारसा भार पडणार नाही, म्हणजेच महागड्या डिझेल आणि पेट्रोलपासून थोडा दिलासा मिळेल.

    होतील अनेक फायदे!

    नितीन गडकरी यांनी यापूर्वी सांगितले होते की येत्या 6-8 महिन्यांत फ्लेक्स इंधन भारतात दाखल होईल आणि त्यानंतर ऑटोमोबाईल कंपन्यांना त्याकडे लक्ष द्यावे लागेल. आता गडकरींच्या विधानाला गांभीर्याने घेत मारुती सुझुकीने या दिशेने प्रयत्न सुरू असून येत्या काळात पहिली फ्लेक्स इंधन इंजिनवर चालणारी कार सादर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सध्या भारतात डिझेल आणि पेट्रोल तसेच सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार आहेत, ज्यावर लोक अवलंबून आहेत. येत्या काळात फ्लेक्स फ्युएल इंजिनवर चालणारी कार अस्तित्वात आल्यास लोकांना नक्कीच दिलासा मिळेल. तसेच, प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण असेल, कारण इथेनॉल हे जीवाश्म इंधन नाही.