
रॉयल एनफिल्डने एक खास टीम तयार केली आहे. ही टीम इलेक्ट्रिक वाहनांच्या (Vehicle) व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल. Royal Enfield EV व्यवसायासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल,असा अंदाज आहे.
रॉयल एनफील्ड (Royal Enfield ) येत्या काही दिवसांमध्ये आपली नवीन मोटरसायकल लॉन्च करणार आहे. ही मोटरसायकल न्यू जनरेशन बुलेट 350 असू शकते. आगामी काळात, हिमालयन 450 सोबत, रॉयल एनफिल्डच्या आणखी काही बाईक्स 350 सीसी ते 650 सीसी सेगमेंटमध्ये येणार आहेत. (Royal Enfield Electric Bike)
रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक (Electric) मोटरसायकलबाबतही चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2025 पर्यंत रॉयल एनफिल्ड आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय रस्त्यावर सादर करू शकते.
एका अहवालानुसार, आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सिद्धार्थ लाल म्हणतात की कंपनी रॉयल एनफिल्डच्या आगामी इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या प्रोटोटाइपची ट्रायल करतेय. पुढील दोन वर्षांमध्ये त्याचं प्रोडक्शन रेडी व्हर्जन रस्त्यावर दिसेल.
रॉयल एनफिल्डने एक खास टीम तयार केली आहे. ही टीम इलेक्ट्रिक वाहनांच्या (Vehicle) व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल. Royal Enfield EV व्यवसायासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल,असा अंदाज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्ड ईव्ही बाईक्सच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची तयारी करत आहे आणि आगामी काळात या संदर्भात घोषणा होऊ शकतात.
रॉयल एनफील्डने मिडसाईज मोटरसायकल (Motorcycle) सेगमेंटमध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. क्लासिक 350, हंटर 350, बुलेट 350, स्क्रॅम 411 आणि 650 ट्विन्ससह अनेक लोकप्रिय मोटरसायकल्स लोकांच्या आवडीच्या आहेत.
मात्र अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत Triumph Speed 400 आणि Harley Davidson X440 सारख्या मोटरसायकलच्या प्रवेशामुळे काही गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे Royal Enfield ला अडचणी येऊ शकतात. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत रॉयल एनफिल्डने 918 कोटींचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 611 कोटींचा नफा कमवला आहे.