एएमओ इलेक्ट्रिक Bikes च्या विक्रीत ५०० टक्क्यांची वाढ

विक्रीच्या (Sale) संदर्भात कर्मचाऱ्यांना उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहित करण्याच्या नेतृत्वाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. व्यवस्थापकीय स्तरावर त्यांनी विक्री व सेवा टीमला (Sales and Service Team) मोठ्या प्रमाणात सामावून घेत प्रोत्साहित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती सादर केल्या, तसेच विक्रीला चालना देण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया सादर केली.

    मुंबई : एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स (AMO Electric Bikes) या भारतातील विश्वसनीय, स्थिर व किफायतशीर ई-मोबिलिटी सोल्युशन्सची निर्मिती करणाऱ्या ब्रॅण्डने ऑक्टोबर २०२१ मध्ये ५०० टक्क्यांहून अधिक वाढीची नोंद केली आहे. कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातील ४१६ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये २५०० युनिट्सची विक्री (Sale) केली आहे.

    विक्रीच्या (Sale) संदर्भात कर्मचाऱ्यांना उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहित करण्याच्या नेतृत्वाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. व्यवस्थापकीय स्तरावर त्यांनी विक्री व सेवा टीमला (Sales and Service Team) मोठ्या प्रमाणात सामावून घेत प्रोत्साहित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती सादर केल्या, तसेच विक्रीला चालना देण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया सादर केली. धनत्रयोदशी व दिवाळीच्या उत्सवी सणाने या पद्धतींच्या ट्रायलमध्ये भर केली, ज्यामुळे जलद वाढ व विकासाला गती मिळाली.

    एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार म्हणाले, “सणासुदीच्या काळामध्ये हा भव्य विकास आनंददायी संकेत आहे. यंदाच्या वर्षातील तिस-या तिमाहीमध्ये देखील सातत्याने विकास होताना दिसत आहे. ऑगस्टमध्ये २०० टक्के, सप्टेंबरमध्ये ३०० टक्के आणि ऑक्टोबरमध्ये ५०० टक्के वाढ दिसण्यात आली. भविष्यात आमचा मासिक ६००० युनिट्सची विक्री करण्याचा मनसुबा आहे. आम्ही भारतातील इलेक्ट्रिक मो‍बिलिटी विभागामध्ये मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतो आणि पुढील ३ वर्षांमध्ये २०० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्याचा आमचा मनसुबा आहे.”

    धनत्रयोदशीच्या दिवशी एकाच दिवसामध्ये ग्राहक रिटेल विक्रीने २५०० ई-बाइक्सचा (नोव्‍हेंबर २०२१) टप्पा गाठला, तुलनेत मागील वर्षी धनत्रयोदशीदरम्यान ३१६ ई-बाइक्सची विक्री करण्यात आली (या दिवशी डिलिव्हरी करण्यात आलेल्या धनत्रयोदशीपूर्व बुकिंगच्या आधारावर). कंपनीने देशभरातील त्यांच्या डिलरशिप्सची संख्या १५० पर्यंत वाढवली आहे.