SBI तर्फे योनोवर प्री-अप्रुव्ह्ड Two-Wheeler Loan लाँच

ही डिजिटल कर्ज योजना (Digital Loan Scheme) ग्राहकांना त्यांच्या आवडीची दुचाकी खरेदी करण्यासाठी मदत करेल. SBI मध्ये आम्ही ग्राहकांना अनोखी, त्यांच्या गरजांचा पूर्व विचार करून तयार करण्यात आलेली उत्पादने व सेवा उपलब्ध करून सोयीस्कर व सफाईदार बँकिंग अनुभव देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.

  • एसबीआयच्या पूर्व मंजुरी असलेल्या ग्राहकांना हे पूर्णपणे डिजिटल, ३ लाख रुपयांपर्यंतचे ‘एसबीआय ईझी राइड’ कर्ज स्पर्धात्मक व्याजदरात मिळणार
  • ऑन- रोड किंमतीच्या ८५ टक्क्यांपर्यंतचे कर्ज पात्रतेनुसार आणि जास्तीत जास्त ४८ महिन्यांसाठी दिले
  • प्रती लाख २५६० रुपयांइतका कमी EMI
  • कर्ज रकमेचे तत्काळ वितरण थेट वितरकाच्या खात्यात
  • शाखेला भेट देण्याची गरज नाही

मुंबई : भारतातील सर्वात मोठी कर्जपुरवठादार स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) Yono द्वारे ‘एसबीआय ईझी राइड’ ही पूर्व- मंजुरी असलेली (Pre Approved) दुचाकी कर्ज योजना (Two Wheeler Loan) लाँच केली आहे. त्याअंतर्गत पात्र एसबीआय ग्राहकांना बँकेच्या शाखेला भेट न देता पूर्णपणे डिजिटल पातळीवरून दुचाकी कर्ज घेता येणार आहे. ग्राहकांना ३ लाख रुपयांपर्यंतचे हे ईझी राइड कर्ज (Easy Ride Loan) १०.५ टक्क्यांच्या स्पर्धात्मक व्याजदरात आणि जास्तीत जास्त ४ वर्षांच्या कालावधीसाठी मिळणार आहे. कर्जाची किमान रक्कम रू. २०,००० वर निश्चित करण्यात आली आहे.

हे कर्ज थेट वितरकाच्या खात्यात जमा केले जाणार आहे. वाहनाच्या ऑन-रोड किंमतीच्या ८५ टक्क्यांपर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध केले जाणार आहे.

‘ही डिजिटल कर्ज योजना (Digital Loan Scheme) ग्राहकांना त्यांच्या आवडीची दुचाकी खरेदी करण्यासाठी मदत करेल. SBI मध्ये आम्ही ग्राहकांना अनोखी, त्यांच्या गरजांचा पूर्व विचार करून तयार करण्यात आलेली उत्पादने व सेवा उपलब्ध करून सोयीस्कर व सफाईदार बँकिंग अनुभव देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.’ हे उत्पादन लाँच करताना अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ‘हे उत्पादन बँकेला दुचाकी कर्ज उपलब्ध करून देत ग्राहकाच्या जीवन चक्राच्या प्राथमिक टप्प्यावर स्थान देईल व पर्यायाने त्यांच्या विकासासह नातेही अद्यायवत करेल. आम्हाला आशा आहे, की ‘एसबीआय ईझी राइड’ ही कर्ज योजना ग्राहकांना दुचाकी खरेदीचा सोयीस्कर आणि अविस्मरणीय अनुभव देईल.’

या न्यू नॉर्मल परिस्थितीमधल्या डिजिटल स्थित्यंराच्या प्रवासात योनो एसबीआय बँकिंग व जीवनशैली सेवा ग्राहकाला घरपोच देण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०१७ मध्ये लाँच झाल्यापासून योनोला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारले असून आतापर्यंत त्यावर ८९ दशलक्ष युजर्स आणि ४२ दशलक्षांपेक्षा जास्त नोदणींकृत युजर्स आहेत. एसबीआयने योनो प्लॅटफॉर्मवरील २० पेक्षा जास्त विभागांतील ११० ई- कॉमर्स कंपन्यांशी भागिदारी केली आहे. प्लॅटफॉर्मवरील इतर उपक्रमांमध्ये योनो कृषी, योनो कॅश आणि पीएपीए यांचा समावेश आहे.