टाटा मोटर्स Celebrates टियागो एनआरजीचा पहिला वर्धापन दिन

टियागो पेट्रोल विक्रीमध्‍ये १५ टक्‍क्‍यांचे योगदान देणाऱ्या या वेईकलची एसयुव्‍ही डिझाइन, रस्‍त्‍यावरील खडतर क्षमता, तसेच विभागातील सर्वोत्तम सुरक्षितता रेटिंग (GNCAP कडून 4 Star) साठी कौतुक करण्‍यात आले आहे.

  • नवीन एक्‍सटी एनआरजी व्‍हेरिएण्‍टची भर घालत केली श्रेणी अद्ययावत

मुंबई : आपले New Forever तत्त्व कायम राखत आणि Tiago NRG चा पहिला वर्धापन दिन साजरा करत टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील अग्रणी ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज 6.42 लाख रूपयांमध्‍ये टियागो एनआरजी एक्‍सटी (Tiago NRG XT) व्‍हेरिएण्‍ट लाँच केली. टियागो एनआरजीला लाँच केल्‍यापासून ग्राहकांकडून अद्भूत प्रतिसाद मिळाला आहे.

टियागो पेट्रोल विक्रीमध्‍ये १५ टक्‍क्‍यांचे योगदान देणाऱ्या या वेईकलची एसयुव्‍ही डिझाइन, रस्‍त्‍यावरील खडतर क्षमता, तसेच विभागातील सर्वोत्तम सुरक्षितता रेटिंग (GNCAP कडून 4 Star) साठी कौतुक करण्‍यात आले आहे. या नवीन व्‍हेरिएण्‍टसह टियागो एनआरजी आता दोन ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल- टियागो एक्‍सटी एनआरजी आणि टियागो एक्‍सझेड एनआरजी.

नवीन टियागो एनआरजी एक्‍सटी व्‍हेरिएण्‍टमध्‍ये नवीन १४ इंच हायपरस्‍टाइल व्‍हील्‍स, हर्मनTM द्वारे ३.५ इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्‍स, हाइट ॲडजस्‍टेबल ड्रायव्‍हर सीट, फ्रण्‍ट फॉग लॅम्‍प्‍स आणि इतर अनेक वैशिष्‍ट्यांसोबत एनआरजी डिझाइन घटक जसे १८१ मिमीचे हाय ग्राऊण्‍ड क्‍लिअरन्‍स, शक्तिशाली क्‍लॅडिंग्‍ज, इन्फिनिटी ब्‍लॅक रूफसह रूफ रेल्‍स आणि चारकोल ब्‍लॅक इंटिरिअर्स आहेत.

याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे सेल्‍स, मार्केटिंग व कस्‍टमर केअरचे उपाध्‍यक्ष राजन अम्‍बा म्‍हणाले, ”टियागो एनआरजी लाँच केल्‍यापासून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आली आहे आणि पसंतीची हॅचबॅक बनली आहे, जी साहसी राइडर्सना, तसेच मनसोक्‍त जीवनाचा आनंद घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांना खडतर प्रदेशामध्‍ये देखील आरामदायी कार्यक्षमतेची खात्री देते. यंदा सणासुदीचा काळ उत्‍साहात सुरू करत आम्‍हाला आमच्‍या ग्राहकांसाठी टियागो एक्‍सटी एनआरजी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. आकर्षक किंमत असलेली ही व्‍हेरिएण्‍ट उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे आणि तिचा ड्राइव्‍ह अनुभव वाढवण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, या वैशिष्‍ट्य संपन्‍न एक्‍सटी व्‍हेरिएण्‍टची भर एनआरजीला आणि एकूण टियागो पोर्टफोलिओला अधिक प्रबळ करेल, ज्‍यामधून त्‍यांच्‍या आगामी विक्रीला चालना मिळेल.”

या साजरीकरणामध्‍ये अधिक भर करत टाटा मोटर्सने नवीन वैशिष्‍ट्यांच्‍या भरीसह विद्यमान टियागो एक्‍सटी व्‍हेरिएण्‍टच्‍या अपग्रेडेशनची घोषणा केली, ज्‍यामुळे हे वाहन अधिक आकर्षक बनले आहे. यामध्‍ये १४ इंच हायपरस्‍टाइल व्‍हील्‍स, हाइट ॲडजस्‍टेबल ड्रायव्‍हर सीट, रिअर पार्सल शेल्‍फ अशा इतर अनेक वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. ही वैशिष्‍ट्ये एक्‍स्‍टी श्रेणीसह टियागो एक्‍सटी, XT4A व एक्‍सटी आयसीएनजीमध्‍ये उपलब्‍ध असतील.

कंपनीने टियागो एक्‍स्‍टी पेट्रोल व्‍हेरिएण्‍टसाठी पर्यायी रिदम पॅक देखील सादर केला आहे, ज्‍यामध्‍ये ७ इंच टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम, रिअर कॅमेरा आणि ४ ट्विटर्सचा समावेश आहे. नवीन एक्‍सटी ट्रिमसाठी 30, 000 रूपये अतिरिक्‍त खर्च करत रिदम पॅकचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच नवीन एक्‍सटी ट्रिम मिडनाइट प्‍लम कलरसह विद्यमान ओपल व्‍हाइट, डेटोना ग्रे, अरिझोना ब्‍ल्‍यू आणि फ्लेम रेड कलर पर्यायांमध्‍ये येते.