
टाटा मोटर्स (Tata Motors) ने भारतात त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किंमती (Passenger Vehicle Prices) 7 नोव्हेंबरपासून वाढणार असल्याची घोषणा केली आहे. कारचे प्रकार आणि मॉडेलनुसार किंमती सरासरी 0.9 टक्क्यांनी वाढतील. उत्पादन खर्च वाढल्याने वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. निर्मात्याने सांगितले की, वाढीव किंमतीचा एक महत्त्वपूर्ण भाग ते स्वतःच घेत आहेत.
निर्मात्याने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची ही पहिलीच वेळ नाही. टाटा मोटर्सने यापूर्वी किमती 0.55 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. जुलैमध्ये जेव्हा टाटा मोटर्सने नेक्सॉन ईव्ही आणि नेक्सॉन ईव्ही मॅक्सच्या किंमती वाढवल्या होत्या तेव्हा किमतीत वाढ झाली होती.
टाटा मोटर्स गेल्या काही वर्षांत सर्वात यशस्वी ऑटोमोबाईल उत्पादक बनली आहे. निर्मात्याने त्याच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओच्या विक्रीत 157 टक्के वाढ नोंदवली आहे. एकंदरीत, कंपनीने मागील महिन्यात 4,277 ईव्हीची विक्री केली होती, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 1,660 युनिट्सची विक्री झाली होती.