प्रतिक्षा संपली! 5 स्टार सेफ्टी वाल्या टाटा पंचची डिलिव्हरी सुरू; आता होणार पैशांची बचतच बचत

टाटा पंच भारतात 5.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे, जी त्याच्या Pure Trim Level व्हेरिएंटची किंमत आहे. त्‍याच्‍या Adventure ट्रिम लेव्‍हलची किंमत 6.39 लाख रुपये आहे, Accomplished ट्रिम लेव्हलची किंमत 7.29 लाख रुपये आहे.

    नवी दिल्ली : स्वदेशी कार निर्माता कंपनी टाटा ने अलीकडेच त्यांची मायक्रो एसयुव्ही (Tata Punch) लाँच केली आहे. तेव्हापासून कार खरेदीदार कारच्या डिलिव्हरीची वाट पाहत होते. मात्र, आता ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने टाटा पंचाची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही कार Agile Light Flexible Advanced (ALFA) आर्किटेक्चरवर आधारित आहे. या कारला अलीकडेच Global NCAP क्रॅश चाचणीत 5 स्टार मिळाले आहेत.

    टाटा पंच भारतात 5.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे, जी त्याच्या Pure Trim Level व्हेरिएंटची किंमत आहे. त्‍याच्‍या Adventure ट्रिम लेव्‍हलची किंमत 6.39 लाख रुपये आहे, Accomplished ट्रिम लेव्हलची किंमत 7.29 लाख रुपये आहे आणि Creative ट्रिम लेव्हलची किंमत 8.49 लाख रुपये आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायासह सर्व प्रकारांच्या या किमती आहेत.

    इंजिन आणि पॉवर

    टाटा पंच कंपनीच्या ALFA (Agile Light Flexible Advanced) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि Tata Altroz प्रीमियम हॅचबॅक देखील त्यावर तयार करण्यात आली आहे. हे 1.2 लिटर 3-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 85bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशन पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, हे 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT सह सादर केली आहे.

    टाटा पंच ही कंपनीची मायक्रो SUV आहे, जी कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये Tata Nexon SUV च्या खाली आहे. ही कार भारतातील ग्राहकांनी घेतली असून या कारला जबरदस्त बुकिंग मिळाले आहे.