टाटा मोटर्स जम्‍मू आणि काश्‍मीरच्‍या स्‍मार्ट शहरांना पर्यावरणास-अनुकूल सार्वजनिक परिवहन सोल्‍युशन्‍स देणार

जम्‍मू व काश्‍मीर सरकारच्‍या पर्यावरणपूरक सार्वजनिक परिवहनासाठी उपक्रमाचा भाग म्‍हणून स्‍टारबस इलेक्ट्रिक बसेसच्‍या (Starbus Electric Buses) ९-मीटरचे १५० युनिट्स आणि १२-मीटरचे ५० युनिट्स असा पुरवठा करण्‍यात येईल.

  • कंपनीला जम्‍मू आणि काश्‍मीरमध्‍ये कार्यरत करण्‍यात येणाऱ्या २०० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली

जम्‍मू : टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज घोषणा केली की, कंपनीला जम्‍मू आणि श्रीनगरसाठी (Jammu and Srinagar) जम्‍मू स्‍मार्ट सिटी लिमिटेडकडून (Jammu Smart City Limited) २०० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे.

Tata Motors ने जम्‍मू आणि काश्‍मीरच्‍या दोन राजधानी शहरांमध्‍ये इलेक्ट्रिक बसेस रुजू करण्‍यासाठी धोरणात्‍मक सहयोग केला आहे. हा सहयोग जम्‍मू आणि श्रीनगरसाठी सार्वजनिक परिवहनाचे पर्यावरणदृष्‍ट्या, सामाजिकदृष्‍ट्या व आर्थिकदृष्‍ट्या स्थिर नेटवर्क स्‍थापित करण्‍यासाठी गृहनिर्माण व शहरी विकास विभाग, जम्‍मू व काश्‍मीर सरकारच्‍या उपक्रमाचा भाग आहे.

जम्‍मू व काश्‍मीर सरकारच्‍या पर्यावरणपूरक सार्वजनिक परिवहनासाठी उपक्रमाचा भाग म्‍हणून स्‍टारबस इलेक्ट्रिक बसेसच्‍या (Starbus Electric Buses) ९-मीटरचे १५० युनिट्स आणि १२-मीटरचे ५० युनिट्स असा पुरवठा करण्‍यात येईल. या कराराचा भाग म्‍हणून टाटा मोटर्स १२ वर्षांच्‍या कालावधीसाठी टाटा स्‍टारबस इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, कार्यसंचालन व देखरेख करणार आहे.

या घोषणेबाबत बोलताना जम्‍मू आणि काश्‍मीर सरकारचे प्रमुख सचिव अरूण मेहता म्‍हणाले, “हरित सार्वजनिक परिवहनाच्‍या दिशेने वाटचाल सुरू असताना जम्‍मू आणि श्रीनगरच्‍या नागरिकांना हरित गतीशीलता सोल्‍यूशनची गरज आहे. आम्‍हाला आमच्‍या सार्वजनिक परिवहन गरजांसाठी टाटा मोटर्ससोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या इलेक्ट्रिक बसेस प्रवासासाठी माध्‍यम असण्‍यासोबत पर्यावरणपूरक जम्‍मू आणि काश्‍मीरची निर्मिती करण्‍याच्‍या दिशेने योगदान देखील देतील.’’

जम्‍मू आणि काश्‍मीर सरकारच्‍या एचयू ॲण्‍ड डीडीचे प्रधान सचिव धीरज गुप्‍ता म्‍हणाले, “इलेक्ट्रिक वाहने भावी परिवहन आहेत. या बसेस पर्यावरणपूरक, शहरी वातावरणासाठी उपयुक्‍त आहेत आणि प्रदूषण कमी करण्‍याप्रती योगदान देतात.’’

याप्रसंगी बोलताना टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍युशन्‍स लिमिटेडचे सीईओ व एमडी आसिम मुखोपाध्‍याय म्‍हणाले, “स्थिर सार्वजनिक परिवहन ही काळाची गरज आहे आणि आम्‍हाला आनंद होत आहे की, टाटा मोटर्सला जम्‍मू आणि काश्‍मीरमधील प्रवाशांना सेवा देण्‍याची संधी मिळाली आहे. आमच्‍या अत्‍याधुनिक इलेक्ट्रिक बसेस आधुनिक वैशिष्‍ट्यांनी सुसज्‍ज आहेत, जे सुरक्षितता व आरामदायी प्रवासाची खात्री देतात. आम्‍हाला जम्‍मू आणि काश्‍मीर सरकारच्‍या पर्यावरणपूरक परिवहन सोल्‍युशन्‍स देण्‍याच्‍या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याचा आनंद होत आहे.’’

२०१९ पासून टाटा मोटर्सच्‍या (Tata Motors) ४० इलेक्ट्रिक बसेस जम्‍मू व काश्‍मीरमध्‍ये धावत आहेत, तसेच भारतातील विविध शहरांमध्‍ये एकूण ७१५ इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्‍यात आला आहे, ज्‍यांनी एकूण ४० दशलक्ष किलोमीटर्सहून अधिक प्रवास केला आहे.

कन्‍वर्जन्‍स एनर्जी सर्वि‍सेस लिमिटेड (सीईएसएल) सोबत केलेल्‍या कराराचा भाग म्‍हणून टाटा मोटर्सला दिल्‍ली ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन (डीटीसी) कडून १,५०० इलेक्ट्रिक बसेससाठी, वेस्‍ट बंगाल ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन (डब्‍ल्‍यूबीटीसी) कडून १,१८० इलेक्ट्रिक बसेससाठी आणि बेंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) कडून ९२१ इलेक्ट्रिक बसेससाठी ऑर्डर्स मिळाल्‍या आहेत.

टाटा मोटर्सच्‍या अत्‍याधुनिक संशोधन व वि‍कास सुविधांनी इलेक्ट्रिक इंधन तंत्रज्ञानासह बॅटरी-इलेक्ट्रिक, हायब्रिड, सीएनजी, एलएनजी व हायड्रोजन फ्यूएल सेल तंत्रज्ञानाची शक्ती असलेल्‍या नवोन्‍मेष्‍कारी मोबिलिटी सोल्‍युशन्‍स निर्माण करण्‍याप्रती काम केले आहे.

ठळक वैशिष्‍ट्ये:

• टाटा मोटर्स २०० स्‍टॅण्‍डर्ड फ्लोअर, १२-मीटर व ९-मीटर इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्‍यासोबत कार्यसंचालन व देखरेख पाहणार
• टाटा स्‍टारबसमध्‍ये आरामदायी प्रवासासाठी आहेत उच्‍च दर्जाची डिझाइन आणि दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये
• टाटा मोटर्सला ३,८०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसच्‍या ऑर्डर्स मिळाल्‍या आहेत