tata punch adventure and punch pure car loan and down payment update emi know price nrvb

मार्केटमध्ये सध्या टाटा पंचने धिंगाणा केला आहे. तिला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ही कार तुम्हाला जर EMI वर खरेदी करायची असेल तर ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.

  नवी दिल्ली : टाटा मोटर्सची (Tata Motors) लोकप्रिय मायक्रो एसयुव्ही पंचने (Micro SUV Punch) भारतीय मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक महिन्याला या कारच्या हजारो युनिटची विक्री होते आहे. तुम्हाला जर टाटा पंच एसयुव्ही (Tata Punch SUV) खरेदी करायची असेल तर तुम्ही फक्त १ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही एसयुव्ही खरेदी करू शकता. याचे बेस मॉडल Tata Punch Pure आणि तिसरे सर्वात स्वस्त व्हेरियंट Tata Punch Adventure वर कार लोन, डाउनपेमेंट आणि ईएमआय व व्याज संबंधी सविस्तर जाणून घ्या.

  किंमत ६ लाखांपासून पुढे

  टाटा पंच प्योर, एडवेंचर, अकॉम्प्लिश्ड आणि क्रिएटिव सारख्या 4 ट्रिम लेवलच्या 26 व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये ते 9.47 लाख रुपये आहे. 1199 cc च्या पेट्रोल इंजिनची ही मायक्रो एसयुव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांत उपलब्ध आहे. टाटा पंचचे मायलेज 20.09 kmpl पर्यंत आहे. आता टाटा पंचला फायनान्समध्ये खरेदी केल्यानंतर कार लोन, ईएमआय आणि डाउनपेमेंट डिटेल्स संबंधी माहिती जाणून घ्या.

  टाटा पंच Pure लोन, ईएमआय आणि डाउनपेमेंट डिटेल्स

  टाटा पंचच्या बेस मॉडल पंच प्योरची एक्स शोरूम किंमत ६ लाख रुपये आहे. ऑन रोड किंमत ६ लाख ५८ हजार ७२८ रुपये आहे. जर तुम्हाला एक लाख रुपयाच्या डाउनपेमेंट करून टाटा पंच प्योर व्हेरियंटला फायनान्स केल्यास तुम्हाला ५ लाख ५८ हजार ७२८ रुपये लोन मिळेल. यावर व्याज दर ९ टक्के आहे. लोन अवधी ५ वर्षापर्यंत आहे. तुम्हाला दर महिन्याला ११ हजार ५९८ रुपये ईएमआय द्यावा लागेल. टाटा पंच प्योर व्हेरियंट फायनान्स केल्यानंतर १.३७ लाख रुपयांहून जास्त व्याज द्यावे लागेल.

  टाटा पंच ॲडवेंचर लोन, ईएमआय आणि डाउनपेमेंट डिटेल्स

  टाटा पंचचे तिसरे सर्वात स्वस्त मॉडल टाटा पंच एडवेंचरची एक्स शोरूम किंमत ६.८५ लाख रुपये आणि ऑन रोड किंमत ७ लाख ७० हजार ८०४ रुपये आहे. पंच एडवेंचर व्हेरियंटला एक लाख रुपये डाउनपेमेंट करून फायनान्स केल्यास तुम्हाला ६ लाख ७० हजार ८०४ रुपये लोन द्यावे लागेल. व्याज दर जर ९ टक्के आहे. तर अवधी पाच वर्षापर्यंत असेल तर पुढील ६० महिन्यात १३ हजार ९२५ रुपये ईएमआय द्यावा लागेल. टाटा पंच एडवेंचर व्हेरियंट फायनान्स केल्यास जवळपास १ लाख ६४५ रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील.