आगामी हेक्टरमध्ये असणार नवीन अग्राइल प्रेरित डायमंड मेश ग्रिल

एमजी मोटर इंडियाने आज बहुप्रतिक्षित नेक्स्ट-जनरेशन हेक्टरच्या लॉन्चच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले, जेथे कंपनीने टीझर सादर केला, जो एसयूव्हीच्या शक्तिशाली उपस्थितीला दाखवतो.

    मुंबई: एमजी मोटर इंडियाने आज बहुप्रतिक्षित नेक्स्ट-जनरेशन हेक्टरच्या लॉन्चच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले, जेथे कंपनीने टीझर सादर केला, जो एसयूव्हीच्या शक्तिशाली उपस्थितीला दाखवतो. कंपनीच्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये नवीन अग्राइल प्रेरित डायमंड मेश ग्रिल असणार असून एमजीची स्पर्धा लक्झरियस कार कंपनी लेक्सससह असणार आहे. अग्राइल प्रेरित डायमंड मेश ग्रिल नेक्स्ट-जनेरशन हेक्टरला साहसी, कमांडिंग व शक्तिशाली स्‍टान्‍स देईल. ग्रिलची आकर्षक डिझाइन हेक्टरच्या सिग्नेचर डीआरएलशी कनेक्ट करण्याकरिता बारकाईने तयार करण्यात आली आहे, ज्यामधून कमांडिंग उपस्थिती अधिक दृढ होते.

    नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे साहसी व शक्तिशाली एक्स्टीरिअर इंटीरिअरला साजेसे आहे, ज्याची संकल्पना भारतातील सर्वात मोठी १४ इंच एचडी पोर्ट्रेट इन्फोटेन्मेंट स्क्रिनला पूरक सिनेमॅटिक व सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी मांडण्यात आली आहे.

    २०२२ च्या अखेरपर्यंत लॉन्च करण्याचे नियोजन करण्यात आलेली नेक्स्ट-जनरेशन हेक्टरची विक्री भारतातील पहिली इंटरनेट एसयूव्ही विद्यमान हेक्टरसोबत करण्यात येईल. या एसयूव्हीला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे.