कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! लवकरच बाजारात येणार या SUV गाड्या

    भारतामध्ये कार घेणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कारचे नवनवीन मॉडेल आणि वेगवेगळे फिचर असलेल्या गाड्या बाजारामध्ये येत आहेत. कार कंपन्या आता कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहेत. आता लवकरच भारतात अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च होणार आहेत आणि त्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च होणार आहेत, ज्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. आज आपण अशा काही गाड्या बघणार आहोत ज्यांची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असणार आहे.

    Mahindra XUV 3XO

    महिंद्रा 29 एप्रिल रोजी भारतात आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO लॉन्च करणार आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळू शकते. नवीन मॉडेलच्या डिझाईनमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. याशिवाय नवे इंटेरिअरही यात पाहायला मिळणार आहे. भारतात महिंद्राची नवीन XUV 3XO कार ही Hyundai Venue, Maruti Brezza, Tata Nexon आणि Kia Sonet यांना आव्हान देणारी ठरेल.

    Skoda Compact SUV

    स्कोडा लवकरच भारतात आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. यात 1.0L 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्सने सुसज्ज असेल. सध्या त्याचे नाव समोर आलेले नाही.

    Hyundai Venue

    Hyundai Motor India आपल्या कॉम्पॅक्ट SUV Venue चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही कार लॉन्च केली जाऊ शकते. या नवीन मॉडेलचे कोड नाव Q2Xi आहे. नवीन मॉडेलच्या डिझाईनपासून त्याच्या इंटीरियरपर्यंत बरेच बदल पाहायला मिळू शकतात.