अपघातचं प्रमुख कारण ठरत असलेली सीएनजी गाड्यांमध्ये गॅस गळती होती का? टाटाने आणले नवीन तंत्रज्ञान

आज आपण सीएनजी गॅस गळती का होते, त्याची प्रमुख कारणं काय याबद्दल जाणून घेणार आहोत.

  आपल्याला अनेकदा रस्त्यावर सीएनजी कारला आग लागलेली दिसून येते. यामधील अनेक प्रकरणांमध्ये, सीएनजी कारमधील गॅस गळती हे आगीचे मुख्य कारण ठरतं. पण ही गॅस गळती कशामुळे होते याचा कधी विचार केला आहे का? गॅस गळतीची अनेक कारणे असू शकतात, परंतु सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या लोकांच्या छोट्या-छोट्या चुका, ज्यामुळे अनेक वेळा गाडीला आग लागू शकते. आज आपण सीएनजी गॅस गळती का होते, त्याची प्रमुख कारणं काय याबद्दल जाणून घेणार आहोत.

  सीएनजी स्टेशनवर तुम्हाला असे लिहिलेले दिसेल की जर तुमच्या गाडीला कंप्लायन्स प्लेट नसेल तर तुम्हाला सीएनजी मिळणार नाही. हा एक प्रकारचा नियम आहे. कारण दर तीन वर्षांनी तुमच्या सीएनजी कारमध्ये बसवलेले सिलिंडर तपासावे लागेल. तुमच्या कारमध्ये बसवलेले सीएनजी सिलिंडर ठीक आहे की नाही, सिलेंडरमधून गॅस गळतीचा धोका आहे का, हेही या चाचणीतून कळते? या चाचणीत तुमच्या कारचा सिलिंडर ठीक असल्याचे आढळले तरच तुमच्या कारसाठी कंप्लायन्स प्लेट जारी केली जाते. त्यामुळे प्रत्येक सीएनजी वाहन धारकाने ही टेस्ट करुन घेणे गरजेचे आहे.

  सीएनजी वाहनातील गॅस गळतीचे कारण

  चालत्या सीएनजी गाडीतून गॅस गळती होऊन गाडीला आग लागली तर काय गाडीत बसलेल्या प्रवाशाला जीवही गमवावा लागू शकतो. सीएनजी वाहनातील गॅस गळतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब फिटिंग. यामुळेच नेहमी असा सल्ला दिला जातो की, कार खरेदी केल्यानंतर स्वत: बाहेरून सीएनजी बसवण्यापेक्षा कंपनीची सीएनजी कार घेणे कधीही चांगले ठरते. पैसे वाचवण्यासाठी लोक कंपनीऐवजी बाहेरून बसवलेला सीएनजी घेतात, पण थोडे पैसे वाचत असल्याने कधी बाहेरून बसवलेल्या सीएनजीला वायरिंगची समस्या भेडसावते, तर कधी सिलिंडरमधून गॅस गळतीची समस्या निर्माण होते.

  टाटा मोटर्सचे तंत्रज्ञान

  सीएनजी गॅस गळतीमुळे कोणाचाही मृत्यू होणार नाही याची काळजी घेण्यासाठी टाटा मोटर्सने एक अप्रतिम तंत्रज्ञान विकसित केले आहे.टाटा मोटर्सच्या या तंत्रज्ञानाचे नाव आहे आयसीएनजी टेक्नॉलॉजी, तुम्ही रस्त्यावर धावणाऱ्या टाटा मोटर्सच्या सीएनजी वाहनांच्या मागील बाजूस आयसीएनजी लिहिलेले पाहिले असेल. टाटा मोटर्सच्या सर्व वाहनांमध्ये लीक डिटेक्शन वैशिष्ट्य वापरले गेले आहे जे तुम्हाला iCNG सह दिसेल. तुम्ही टाटाच्या अधिकृत साइटवर कारचे तपशील वाचता तेव्हा तुम्हाला लीक डिटेक्शनचा उल्लेख देखील आढळेल.