आता एलोन मस्कची टेस्ला बिटकॉइनच्या माध्यमातून करणार मोटारींची विक्री, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

टेस्लाच्या कार खरेदीसाठी देण्यात आलेले बिटकॉइन, पैशांमध्ये रुपांतरित करता येणार नाहीत आणि कंपनी“ अंतर्गत आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर” चा वापर करून ते अंमलात आणणार आहे. मस्क यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “आता तुम्ही टेस्ला बिटकॉइनच्या माध्यमातून खरेदी करू शकता.

  मुंबई : टेस्ला (Tesla) आता आपल्या कस्टमर्सला बिटकॉइन (Bitcoin) च्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार (Electric Cars) विकण्याच्या तयारीत आहे. टेस्लाचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी बुधवारी ट्विट (Tweet) करत याची माहिती दिली आहे. जगभरात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) च्या वापरासाठी एक महत्त्वाचा निर्णय असल्याचे मानले जात आहे.

  रॉयटर्सने दिलेल्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक-कार निर्माता कंपनीने गेल्या महिन्यात जवळपास 1.5 अब्ज डॉलर्सचे बिटकॉइन खरेदी केले आहेत आणि लवकरच बिटकॉइनच्या माध्यमातून कार खरेदी करण्यासाठी स्वीकारण्यातही येणार आहेत. तथापि बिटकॉइन जगातील सर्वात मोठी डिजिटल मुद्रा मानली जाते आणि आता मस्कच्या या ट्विटनंतर याच्या मागणीत जवळपास 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  अहवालात म्हटलं आहे की, मस्क म्हणाले की, टेस्लाच्या कार खरेदीसाठी देण्यात आलेले बिटकॉइन, पैशांमध्ये रुपांतरित करता येणार नाहीत आणि कंपनी“ अंतर्गत आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर” चा वापर करून ते अंमलात आणणार आहे. मस्क यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “आता तुम्ही टेस्ला बिटकॉइनच्या माध्यमातून खरेदी करू शकता.”

   

  टेस्लाची भारतात एंट्री झाली आहे. टेस्लाने बेंगळुरूत कंपनीची नोंदणी केली असून भारतात प्रवेश केला आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज वेबसाइटवर उपलब्ध विवरणानुसार, टेस्ला इंडिया मोटर्स अॅन्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश करण्यात आलेला आहे.

  ही कंपनी खासगी असूचीबद्ध कंपनी म्हणून नोंदणीकृत असल्याची नोंद आहे, ज्याचे अधिकृत भांडवल 15,00,000 रुपये आणि गुंतवणूकदारांकडून घेतलेले भांडवल 10,00,000 रुपये आहे. याक्षणी, टेस्लाच्या विक्री टीम्स सध्या भारतीय बाजारपेठेसाठी कस्टम विक्री आणि उत्पादन ऑर्डर तयार करण्यावर काम करत आहेत.