झूमकार सार्वजनिकरित्या होणार सूचीबद्ध; इनोव्‍हेटिव्ह इंटरनॅशनल ॲक्विझिशन कॉर्पोरेशनसह विलिनीकरण

झूमकारचे (Zoomcar) सध्या ३ दशलक्षहून अधिक सक्रिय युजर्स आहेत आणि त्यांच्या जागतिक कार-शेअरिंग बाजारस्थळावर वापरासाठी २५,००० हून अधिक वाहने नोंदणीकृत आहे. ही उपलब्धी कार-शेअरिंग व्यासपीठ लाँच केल्याच्या फक्त १२ महिन्यांमध्ये संपादित करण्यात आली आहे.

    मुंबई : झूमकार इन्क. (ZoomCar) हे जगातील सर्वात मोठे उदयोन्मुख बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणारे कार शेअरिंग व्यासपीठ आणि इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल ॲक्विझिशन कॉर्पोरेशन “इनोव्हेटिव्ह’’ ही सार्वजनिकरित्या व्यापार करणारी विशेष हेतू संपादन कंपनी यांनी आज निश्चित विलिनीकरण करार “मर्जर ॲग्रीमेंट’’ केल्याची घोषणा केली.

    यामुळे ZoomCar सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपनी बनेल. संयुक्त कंपनीचे “कम्बाइन्ड कंपनी” व्यवहाराचे मूल्य अंदाजे ४५६ दशलक्ष डॉलर्सच्या निहित प्रो फॉर्मा एंटरप्राइज मूल्याइतके होते. क्‍लोजिंगनंतर संयुक्त कंपनीचे नाव बदलून झूमकार होल्डिंग्स, इन्क. (Zoomcar Holdings, Inc) असे ठेवण्यात येईल आणि नॅसडॅकवर त्यांचा सामान्य स्टॉक सूचीबद्ध करण्याची अपेक्षा आहे.

    झूमकारचे (Zoomcar) सध्या ३ दशलक्षहून अधिक सक्रिय युजर्स आहेत आणि त्यांच्या जागतिक कार-शेअरिंग बाजारस्थळावर वापरासाठी २५,००० हून अधिक वाहने नोंदणीकृत आहे. ही उपलब्धी कार-शेअरिंग व्यासपीठ लाँच केल्याच्या फक्त १२ महिन्यांमध्ये संपादित करण्यात आली आहे.

    मूलभूत बाजारपेठांमध्ये प्रतिदिन १ ते २ तास खाजगी कार वापर दरांसह झूमकारला अपवादात्मकरित्या अनुकूल बाजारपेठ डायनॅमिक्सचा फायदा होतो, जेथे ते वाहन मालकांना त्यांच्या कार-शेअरिंग बाजारस्थळावर होस्ट्स बनवतात. आपल्या अतिथीसंदर्भातील व्यवसायामध्ये झूमकारला मुलभूत बाजारपेठांमधील खाजगी कार वापरासाठी विविध प्रकारच्या वापराचा फायदा होतो. कोविड-१९ महामारीनंतर रिकव्हरी देखील अल्पकालीन वाहन वापरासाठी लक्षणीय संधी देते.

    झूमकारचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मॉरन म्हणाले “झूमकारचा उच्च मापनीय बाजारस्थळ केंद्रित कार शेअरिंग व्यासपीठाच्या सादरीकरणाच्या माध्यमातून उदयोन्मुख बाजारपेठांमधील शहरी गतीशीलता क्षेत्रामध्ये मुलभूतरित्या परिवर्तन घडवून आणण्याचा मनसुबा आहे.”

    झूमकारने लाँच झाल्यापासून अवलंबतेच्या गतीसह स्थिर प्रगती केली आहे आणि चार देश व ५० हून अधिक शहरांमध्ये आपली उपस्थिती निर्माण केली आहे. झूमकारचा बाजारपेठांमधील पहिला प्रवर्तक लाभ प्रबळ ब्रॅण्ड जागरूकता निर्माण करतो, ज्यामधून भावी व्यवसाय उभारणीसाठी त्‍यांचे उत्‍पादन-संचालित, सेंद्रिय विकास धोरणाचा पाया रचला जातो.