20 acres of sugarcane in Beed burnt to ashes

दिवाळीच्या तोंडवर निघाल बळीराजाचं दिवाळ निघाल्याची धक्कादायक घटना बीड(beed)मध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव येथील शेतकऱ्यांचा 20 एकरावरील ऊस आगीत जळून खाक झाला आहे. महावितरण (MSEDCL ) च्या गलथान कारभारामुळे ऊसाच्या फडात आग लागल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.   

बीड : दिवाळीच्या तोंडवर निघाल बळीराजाचं दिवाळ निघाल्याची धक्कादायक घटना बीड(beed)मध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव येथील शेतकऱ्यांचा 20 एकरावरील ऊस आगीत जळून खाक झाला आहे. महावितरण (MSEDCL ) च्या गलथान कारभारामुळे ऊसाच्या फडात आग लागल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

बुधवारी दुपाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या शेतात महावितरणचे खांब लावण्यात आलेत. अचानक येथील दोन तारांमध्ये संपर्क ठिणगी उडाल्या. यातील विद्युत तारेवरची ठिणगी ऊसाच्या फडात पडली आणि हा अनर्थ घडला. काहीच क्षणात या ऊसाच्या फडात आग भडकली. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केले. या भीषण आगीत 20 एकरावरील ऊसाचा कोळसा झाला.

डोळ्यात देखत पेटत असलेला ऊसचा फड पाहून शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले. मात्र, यात या शेतकऱ्यांना अपयश आले.

शेतकरी भारत शंकर दातवासे, अर्जुन शंकर दातवासे, भीमराव शंकर दातवासे, नारायण दातवासे, भागवत आखरे, मुक्ताबाई खूपसे, लक्ष्मण आखरे या शेतकऱ्यांचा 20 एकर ऊस शेतीचे नुकसान झाले आहे.

या आगीचा तातडीने पंचनामा करून तात्काळ 1 लाख रुपये एकरने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी  स्वाभिमानी युवती आघाडीकडून करण्यात आली आहे.