बीड जिल्ह्यात ३७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

  • आज पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये बीड शहरातील १६ जण आढळून आले आहेत. तर बीड तालुक्यात २१, गेवराई २, आष्टी१, परळी तालुक्यात ५ आणि अंबाजोगाई येथील भागात ८ रूग्ण आढळून आले आहेत. परंतु सर्वाधिक रूग्ण बीड आणि परळी या दोन ठिकाणी आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज बुधवार २९ जुलै रोजी बीड जिल्ह्यात ३७ कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांचा आकडा ६४३ वर पोहोचला आहे. तसेच ३४१ रूग्णांवर उपचार सुरू असून, ३०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी उपचार घेत असलेले रूग्ण हे सौम्य लक्षणे असलेले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये बीड शहरातील १६ जण आढळून आले आहेत. तर बीड तालुक्यात २१, गेवराई २, आष्टी१, परळी तालुक्यात ५ आणि अंबाजोगाई येथील भागात ८ रूग्ण आढळून आले आहेत. परंतु सर्वाधिक रूग्ण बीड आणि परळी या दोन ठिकाणी आढळून आले आहेत.

त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कुठलीही लक्षणे जाणवू लागल्यास लगेच तपासणी करून उपचार सुरू करावेत, आरोग्य प्रशासन याबाबतीत वारंवार सूचना करत आहे.