बीड शहरात ५७ बॉक्स देशी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अवैधरित्या होणार्‍या दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. शुक्रवारी  बीड शहरातील कब्बाडगल्ली येथून 57 बॉक्स देशी दारु जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार आहे.

    बीड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अवैधरित्या होणार्‍या दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. शुक्रवारी  बीड शहरातील कब्बाडगल्ली येथून 57 बॉक्स देशी दारु जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार आहे.

    शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कबाडगल्ली येथील अंकुश वसंतराव कदम याच्या राहत्या घरी धाड टाकली. यावेळी वाहन पार्किंगच्या जागेत जिन्याखाली देशी दारुचा साठा लपवून ठेवला असल्याचे दिसून आले. देशी दारु बॉबी संत्रा या ब्रँडचे 180 मिली क्षमतेचे 57 बॉक्स ज्याची किंमत एक लाख 64 हजार 160 रुपये एवढी आहे. आरोपी अंकुश वसंतराव कदम (वय 44 रा.कबाड गल्ली) बीड याने लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने सदर दारूसाठा ठेवला होता. आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

    ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक कडवे, दुय्यम निरीक्षक घोरपडे, नायबळ, शेळके, गायकवाड, जवान नजमा शेख, मोरे, मस्के, सादेक अहमद, गोणारे व जवान वाहन चालक जारवाल, शेळके यांनी केली.