बीडमध्ये एकाच दिवसात ८३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे. बीड जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून आज रविवार कोरोनाग्रस्तांचा आकडा ८६४ वर पोहोचला आहे. यामध्ये बीड शहर, परळी, अंबाजोगाई, गेवराई, पोटादा, माजलगाव, शिरूर आणि आदि. भागांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाने चांगलाच विळखा घातला असून मृतांची संख्या आतापर्यंत ३० इतकी झाली आहे.   दरम्यान, काल शनिवारी बीड शहरात २० आणि परळीत ३६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. परंतु  आज रविवार ४१९  जणांवर उपचार सुरू होते. यामध्ये ४२ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून एकूण ४१६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.