भय इथले संपत नाही, बिबट्याच्या हल्ल्यात १० वर्षीय मुलाचा मृत्यू, वनविभागाचं दुर्लक्ष कशामुळं होतयं ?

बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack ) १० वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी आष्टी तालुक्यातील किन्ही येथे १२ वाजताच्या सुमारास घडली. स्वराज्य सुनिल भापकर ( Swarajya Sunil Bhapkar) असे या मृत मुलाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यात ( Ashti taluka ) बिबट्याने हल्ला केल्याची पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack ) १० वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी आष्टी तालुक्यातील किन्ही येथे १२ वाजताच्या सुमारास घडली. स्वराज्य सुनिल भापकर ( Swarajya Sunil Bhapkar) असे या मृत मुलाचे नाव आहे.

स्वराज्य भापकर श्रीगोंदा ( Shrigonda )  तालुक्यातील भापकर वाडी येथील राहणारा असून तो दिवाळीच्या सुटीत किन्ही येथे आपल्या आजीकडे आला होता. नातेवाईकांसोबत तुरीला पाणी देण्यासाठी शेतात जात असताना अचानक बिबटयाने स्वराज्यवर झडप घातली आणि त्याला दूर नेले. त्यात स्वराजचा मृत्यू झाला आहे. सुरुडी गावातील पंचायत समिती सदस्याच्या पतीवर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

एकाच आठवडयातील ही दुसरी घटना असल्याने बिबटयाची तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ या गोष्टीवर लक्ष घालून बिबटयाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.