जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला विमा कंपनीकडून केराची टोपली; कृषी कार्यालयाला टाळं

बीड जिल्ह्यात ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या दरम्यान मुसळधार पाऊस झालाय. अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झालंय. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला अशा शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत तक्रार करण्याचे निर्देश प्रशासनाचे आहेत. मात्र यावेळी शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय.

    बीड : बीड जिल्ह्यात ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या दरम्यान मुसळधार पाऊस झालाय. अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झालंय. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला अशा शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत तक्रार करण्याचे निर्देश प्रशासनाचे आहेत. मात्र यावेळी शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय.

    शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार करण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेता जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी तालुकास्तरावर ऑफलाइन तक्रार करण्यासाठी कक्षाची उभारणी केलीय. मात्र या कक्षात एकही विमा कंपनीचे अधिकारी तसेच कृषी अधिकारी हजर नसल्याने शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागतंय.

    दरम्यान सुट्टीच्या दिवशी देखील अधिकाऱ्यांनी हजर राहून शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारावे असे निर्देश असताना देखील कृषी कार्यालयाला टाळचं आहे. खरीप हातचं गेल्यानं शेतकरी रब्बीची तयारी करतोय, माञ कृषी विभागाच्या मनमानी कारभाराने नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतीची सर्व काम सोडून कृषी विभागाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आलीय.