A fire at the LIC office in Beed

ही भीषण आग अग्निशमन दलाने पूर्णपणे आग आटोक्यात आणली आहे. त्यामुळे सध्या ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. पहाटेच्या सुमारास भीषण अग्नितांडव एलआयसी ऑफिसमध्ये झाला असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

बीड : बीड शहरातील एलआईसी ( LIC office in Beed)  कार्यालयाला भीषण आग (fire broke out ) लागली. पाहाटेच्या सुमारास कार्यालयात आग्नितांडल पाहायला मिळाले. आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाल्याने लाखो कागदपत्रांची राखरांगोळी झाली आहे. यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

पहाटेच्या सुमारास आग लागल्याने संपूर्ण कार्यालयात आग पसरली. घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २ गाड्या दाखल झाल्या होत्या. पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र प्रचंड आर्थिक नुकसानी झाली आहे. कार्यालयातील जुने दस्तावेज आणि संगणक महत्त्वाचे साहित्य जळून राख झाले ( entire office on fire) आहेत. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर आगीव नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.