चेकपोस्टवरील ड्युटी पुर्ण करुन घरी परतताना भीषण अपघात, शिक्षकाचा मृत्यू ३ जखमी

बीड - राज्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन केला होता. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना परवानगी टाळण्यात आली होती. चेकपोस्टवर पोलिसांसोबत शिक्षकांनाही सहाय्य

 बीड – राज्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन केला होता. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना परवानगी टाळण्यात आली होती. चेकपोस्टवर पोलिसांसोबत शिक्षकांनाही सहाय्य करण्यास तैनात केले आहे. बीडमधील जिल्ह्या सीमा चेकपोस्टवरुन ड्युटी पुर्ण झाल्याने शिक्षक आपल्या घरी जात होते. परंतु तेव्हाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि शिक्षकाचा त्यात प्राण गेला.

काय आहे प्रकरण 

बीडमधील शिरुर रस्त्यावरुन शिक्षक स्विफ्ट चारचाकी गाडीतून परतत होते. तेव्हाच भरधाव टाटा सुमोची आणि स्विफ्टची धडक झाली, धडक इतकी भीषण होती की त्यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.