petrol thrown on girlfriend

प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला (Beed Acid Attack) करुन नंतर  तिला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. या घटनेतील आरोपीला नांदेड पोलिसांनी (Accused Arrested By Nanded Police) २४ तासात अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

बीड : प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला (Beed Acid Attack) करुन नंतर  तिला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. या घटनेतील आरोपीला नांदेड पोलिसांनी (Accused Arrested By Nanded Police) २४ तासात अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका झाली. यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रं फिरवली आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आरोपी अविनाश राजुरे(Avinash Rajure) याला अटक केली आहे. या घटनेनंतर २४ तासातच पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.

या घटनेनंतर आरोपी अविनाश राजुरे घटनास्थळावरुन फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता. अखेर तो नांदेड पोलिसांच्या हाती लागला असून त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. पीडित तरुणीचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता.

शनिवारी लक्ष्मीपूजनच्या दिवशी बीड तालुक्यातील येळंबघाट येथे रस्त्यालगत २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. शेळगाव ( ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री दिवाळीसाठी दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने जाळल्याने तरुणीचे ४८ टक्के टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी तब्बल 12 तास रस्त्याशेजारी पडून होती.

दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर ( ता.बीड ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, उपचारादम्यान या तरुणीचा मृत्यू झाला.