तीस हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी परळी महावितरणच्या कनिष्ठ लिपिकावर गुन्हा दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वीजबिल भरणा नियमित केल्यानंतरही बिलावर थकबाकी दिसते, व्यावसायिक मिटरचा प्रकार असताना औद्योगिक वीजाकारणी होणे आदी तांत्रिक बाबी पुर्ण करून वीजबिलाचे दुरुस्तीचे वरिष्ठांकडुन काम करुन देण्यासाठी एका नागरिकाकडून तब्बल तीस हजार रुपये लाच स्विकारल्या प्रकरणी आज दि.१ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून परळी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एक खाजगी व्यक्ती अशा दोघांवर कारवाई केली.

    परळी : वीजबिल भरणा नियमित केल्यानंतरही बिलावर थकबाकी दिसते, व्यावसायिक मिटरचा प्रकार असताना औद्योगिक वीजाकारणी होणे आदी तांत्रिक बाबी पुर्ण करून वीजबिलाचे दुरुस्तीचे वरिष्ठांकडुन काम करुन देण्यासाठी एका नागरिकाकडून तब्बल तीस हजार रुपये लाच स्विकारल्या प्रकरणी आज दि.१ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून परळी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एक खाजगी व्यक्ती अशा दोघांवर कारवाई केली.

    दरम्यान याबाबत प्राप्त माहिती अशी आहे की, परळी शहरातील तक्रारदार वीज ग्राहक यांचे मिटरचा प्रकार हा इंडस्ट्रियल मिटरचा होता. व्यावसायिक वीज मिटरला आकारण्यात येणारे वीजबीलही ते नियमितपणे भरणा करीत होते. तरीही वीजबिलावर थकबाकी दाखवली जात होती.याबाबत वारंवार लेखी व तोंडी सांगुनही या ग्राहकाचा वीजबिलाचा गुंता सुटत नव्हता. वेळोवेळी या कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या.वीजबील भरणा करुनही विनाकारण मनस्ताप सहन करण्याची वेळ आली होती.शेवटी कंटाळून या ग्राहकाने वीजवितरण चे कनिष्ठ लिपिक सचिन सुर्यवंशी यांच्याशी तडजोड केली. वीज बील दुरुस्ती प्रस्ताव वरिष्ठांकडुन मंजुरी घेऊन काम करुन देण्यासाठी लिपिक सुर्यवंशी यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार अर्ज दिला होता. ठरल्याप्रमाणे लिपिक सुर्यवंशी यांनी व खाजगी व्यक्ती नामे आरोपी शेख सगिर फकीर महमद हे आज दि.१ रोजी वीज भरणा केंद्राजवळ ३० हजार रुपये लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली.

    तसेचं या प्रकरणात परळी शहर पोलिस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उस्मानाबाद घटकाच्या पथकाने ही कारवाई केली.पोलीस अधीक्षक डॉ राहूल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक मारोती पंडित, डिवाय एसपी प्रशांत संपते उस्मानाबाद, डिवाय एसपी श्री. हनपुडे, पीआय अशोक हुलगे, पोलीस हवालदार शेख, पोलीस शिपाई बेळे, चालक करडे आदींचा या कामगिरीत समावेश आहे.