राज्यात कोरोना विषाणूचा विळखा
राज्यात कोरोना विषाणूचा विळखा

बीड जिल्ह्यात (Beed district) आलेल्या अहवालानुसार १७६ (Addition of 176) नव्या कोरोना रुग्णांची (corona patients)  भर पडली आहे. तसेच १ हजार २४ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ५ हजार १०९ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

बीड जिल्हयात (Beed district) कोरोना रूग्णांच्या आकड्यात दिवसागणिक वाढत होत आहे. काल शुक्रवारी मध्यरात्री बीड जिल्ह्यात आलेल्या अहवालानुसार १७६ (Addition of 176) नव्या कोरोना रुग्णांची (corona patients)  भर पडली आहे. तसेच १ हजार २४ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ५ हजार १०९ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात १ हजार २४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ८४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ६२ जणांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात १३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १७६ पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई तालुका १६, आष्टी १९, बीड ४६, गेवराई १० आणि इतर काही भागांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत १३८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर बीड जिल्ह्यात मृत्यू दर २.७० टक्के इतका आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ७०.७० टक्के इतके आहे.