पोलिसांची कौतुकास्प कामगिरी: भिकाऱ्याची लंपास झालेली १ लाख ७२ हजारांची रोकड अवघ्या काही तासात पोलिसांनी दिली मिळवून

मंदिर परिसरात बाबुराव नाईकवाडे हे मागील अनेक वर्षांपासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र करोनामुळे गेल्यावर्षी पासून मंदिर बंद असल्याने अनेक भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच आयुष्यभर जमा केलेली रक्कम चोरट्याने लंपास केल्याने नाईकवाडे चिंताग्रस्त झाले होते.मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांना त्यांची रक्कम परत मिळाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

    परळी: काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजीमंदिर परिसरात भीख मागणाऱ्या भिकाऱ्याकडे त्याच्या मृत्यूनंतर भीक मागून जमवलेली ६ लाख रुपयांची रक्कम आढळून आली होती अशीच काहीशी घटना महाराष्ट्रातील परळीमध्ये घडली आहे. परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची तब्बल १ लाख ७२ हजार रुपयांची रोकड चोरिला गेल्याची घटना घडली. मात्र परळी पोलिसांनी घटनेची तात्काळ दाखल घेत अवघ्या काही तासातच शोध लावत त्यांना त्यांची रक्कम परत मिळवून दिली आहे. मात्र भिकाऱ्याकडे असलेली एवढी रक्कम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

    मंदिर परिसरात बाबुराव नाईकवाडे हे मागील अनेक वर्षांपासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र करोनामुळे गेल्यावर्षी पासून मंदिर बंद असल्याने अनेक भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच आयुष्यभर जमा केलेली रक्कम चोरट्याने लंपास केल्याने नाईकवाडे चिंताग्रस्त झाले होते.मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांना त्यांची रक्कम परत मिळाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कोरोना सारख्या अत्यंत कठीण काळात भिकाऱ्याला त्याचे पैसे परत मिळाल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.