खासदार प्रीतम मुंडेंना मंत्रीपदापासून डावल्यानंतर बीडमध्ये राजीनामासत्र सुरू, आज सविता बडेंनी दिला जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा

खासदार प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रीपदापासून डावलल्यानंतर, बीड जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे. काल भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

    बीड : खासदार प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रीपदापासून डावलल्यानंतर, बीड जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे. काल भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

    दरम्यान आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे.

    दोन दिवसात तब्बल चौदा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखीन किती राजीनामे येणार ? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.