पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य धागा असलेला अरुण राठोड कुटुंबासह गायब

ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, तसा अरुण राठोड हा आपल्या कुटुंबासोबत गायब आहे. अरुण राठोड प्रकरणातील महत्वाचा धागा असल्याने त्यांच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे अरुण राठोड यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

    परळी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाता दिवसेंदिवस नवी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर या प्रकरणी गंभीर आरोप होत आहे. तर दुसरीकडे पूजा चव्हाणच्या भावासोबत राहत असणार अरुण राठोड हा आपल्या कुटुंबीयांसोबत गायब झाल्याचे समोर आले आहे.

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात झालेल्या संवादच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये दोघांच्या संवादाची जोरदार चर्चा रंगली असून विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण, या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या अरुण राठोडचा आवाज आहे तो अरुण राठोड हा पूजा चव्हाण हिच्या भावांसोबत एकाच घरात राहत होता.