अशोक चव्हाण सत्तेत असल्याने मुक्ताफळं उधळतात, चव्हाणांनी समाजाचं वाटोळं केलं : विनायक मेटे

चव्हाण सत्तेत असल्याने मुक्ताफळं उधळत आहेत. चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेलं, त्यांच्या एवढं समाजाचा वाटोळं कोणीच केलं नाही. एवढं करून सुद्धा त्यांना शहाणपण सुचत नसल्याचं आमदार मेटे यांनी म्हटलं आहे.

    बीड : मोर्चे काढून काहीच निष्पन्न होणार नाही. या प्रश्नी संसदेत प्रश्न उचलण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे वक्तव्य केलं होतं. आणि यालाच उत्तर देत आमदार विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. चव्हाण सत्तेत असल्याने मुक्ताफळं उधळत आहेत. चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेलं, त्यांच्या एवढं समाजाचा वाटोळं कोणीच केलं नाही. एवढं करून सुद्धा त्यांना शहाणपण सुचत नसल्याचं आमदार मेटे यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान राजकारण करण्याचे काम चव्हाण करतात, जे सरकारच्या हातात आहे. तेवढं त्यांनी करावं, मग दुसऱ्याकडे बोट दाखवावं असं म्हणत मेटे यांनी चव्हाणांवर टीका केली आहे.