अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; विनायक मेटे यांची मागणी

    बीड : मराठा समाजासाठी आजचा दिवस काळा दिवस आहे. हा विकास आघाडी च्या अपयशामुळे मराठा आरक्षण अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही असंही ते म्हणाले.

    दरम्यान सरकारला वकील हजर करता आला नाही असा देखील आरोप विनायक मेटे यांनी केला. यामुळेच मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकला नाही याला सर्वस्वी जबाबदार महा विकास आघाडीचे सरकार आहे असा टोला त्यांनी लगावला तसेच यापुढे आघाडीच्या सरकारला दाखवून देण्यासाठी नियम पाळून आंदोलन करा असे आवाहन देखील मेटे यांनी केले.