बी – बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांची बेदम मारहाण…

बियाणं खरेदीसाठी आलो असल्याचं सांगून देखील मोतीराम चाळक यांना ही बेदम मारहाण झाली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीनंतर नाकरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

    बीड : बी – बियाणे खरेदीसाठी बीडच्या गेवराई इथल्या बाजारपेठेत आलेल्या एका शेतकऱ्यास लॉकडाऊनचे कारण सांगत, गेवराई पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. यामध्ये शेतकरी मोतीराम चाळक हे जखमी झाले आहेत.

    दरम्यान सध्या शेतकरी खरिपाची तयारी करतोय, यासाठी बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकरी बीडमधील मोंढ्यात येत आहेत. तर जिल्हा प्रशासनाने देखील कृषी दुकानं खुले ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असं असताना बियाणं खरेदीसाठी आलो असल्याचं सांगून देखील मोतीराम चाळक यांना ही बेदम मारहाण झाली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीनंतर नाकरिकांनी संताप व्यक्त केला आहे.