बीडमध्ये आजपासून अनलॉक सुरू; मार्केट उघडण्यास सुरुवात तर लालपरीला मिळतोय चांगला प्रतिसाद…

बीड आगारातील बस दिवसभरात औरंगाबाद, जालना, शिर्डी, सोलापूर, पंढरपूर, नांदेड, परभणी उस्मानाबाद, यासह अनेक जिल्ह्यातून 30 फेऱ्या मारणार आहेत. मात्र ग्रामीण भागात अत्यल्प प्रतिसाद असल्यानं या बस बंद आहेत. अशी माहिती आगारप्रमुख निलेश पवार यांनी दिली.

    बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊननंतर, आजपासून बीड जिल्ह्यात निर्बंध घालत अनलॉक सुरू झाला आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व आस्थापनांना उघडण्यास मुभा दिली आहे. तर अनलॉकनंतर सकाळपासूनचं मार्केट उघडण्यास सुरुवात झाली.

    दरम्यान बीड शहरातील सुभाष रोड मार्केट, डीपी रोड मार्केट, त्याचबरोबर शहरातील किरकोळ दुकाने उघडल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुकानं उघडली असली तरी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसत आहे. तर दुसरीकडं लालपरी देखील प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाली.

    आज सकाळी साडेसहा वाजता पहिली गाडी औरंगाबादला सोडण्यात आली आहे. तर सकाळपासून या लालपरीला चांगला प्रतिसाद मिळत असून 70 ते 80 टक्के क्षमतेने प्रवासी मिळत आहेत. बीड आगारातील बस दिवसभरात औरंगाबाद, जालना, शिर्डी, सोलापूर, पंढरपूर, नांदेड, परभणी उस्मानाबाद, यासह अनेक जिल्ह्यातून 30 फेऱ्या मारणार आहेत. मात्र ग्रामीण भागात अत्यल्प प्रतिसाद असल्यानं या बस बंद आहेत. अशी माहिती आगारप्रमुख निलेश पवार यांनी दिली.