मंत्रिपदात मुंडेना डावलले… बीड जिल्हा भाजपात अस्वस्थता, जिल्हा भाजपा सरचिटणीसांनी दिला राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खा , डॉ.प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर बीड जिल्हा भाजपातील अस्वस्थतेला तोंड फुटले आहे . पक्षाने प्रीतम मुंडेंवर अन्याय केल्याचे सांगत बीड जिल्हा भाजपचे सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .

    बीड : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खा , डॉ.प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर बीड जिल्हा भाजपातील अस्वस्थतेला तोंड फुटले आहे . पक्षाने प्रीतम मुंडेंवर अन्याय केल्याचे सांगत बीड जिल्हा भाजपचे सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .

    बीड जिल्हा भाजपात दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता आहे . मुंडे समर्थक आपली नाराजी समाजमाध्यमांमधुन व्यक्त करीत आहेत. आता ही अस्वस्थता राजीनाम्यापर्यंत पोहचली आहे . बीड जिल्ह्यातील मुंडेंचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला आहे.

    दरम्यान जिल्ह्यातील इतरही अनेक पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती आहे .पक्षाने मुंडे कुटुंबावर अन्याय केला आहे म्हणून मी राजीनामा देत आहे असा सर्जेराव तांदळे यांनी सांगितलं