बीड जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा दणका; सीसीसीच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी डॉक्टरसह ७ जण कार्यमुक्त…

सीसीसीमधील स्वच्छता आणि इतर बाबींमध्ये मोठ्याप्रमाणावर ढिलाई दिसल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . आ . बी . पवार यांनी येथील डॉ . माधुरी पाचारणे यांच्यासह एएनएम आश्विनी पानतावणे , रुपाली काळे आणि वॉर्ड बॉय निखिल वाघुळे , आकाश राऊत , सुमित धोंडे आणि भारत राऊत यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले असून गुन्हे दाखल का करू नयेत याची नोटीस देखील बजावली आहे.

    बीड : बीडच्या आष्टी येथील कोरोना केअर सेंटरच्या कामात हलगरजपणा केल्यामुळे एका डॉक्टरसह एएनएम आणि वॉर्डबॉय अशा ७ जणांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . आर . बी . पवार यांनी ही कारवाई केली.

    दरम्यान पवार बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि डॉ. आर. बी. यांनी शनिवारी सकाळी आष्टीच्या सीसीसीला भेट दिली . त्यावेळी रुग्ण परिसरात फिरत असलेले आढळले , तर या ठिकाणी ड्युटीवर असलेले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सीसीसीमध्ये न थांबता समोरच्या इमारतीत थांबले होते.

    तसेचं सीसीसीमधील स्वच्छता आणि इतर बाबींमध्ये मोठ्याप्रमाणावर ढिलाई दिसल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . आ . बी . पवार यांनी येथील डॉ . माधुरी पाचारणे यांच्यासह एएनएम आश्विनी पानतावणे , रुपाली काळे आणि वॉर्ड बॉय निखिल वाघुळे , आकाश राऊत , सुमित धोंडे आणि भारत राऊत यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले असून गुन्हे दाखल का करू नयेत याची नोटीस देखील बजावली आहे.