mumbai Actress accused of raping director

सहकारी प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओ पाठवणाऱ्या बीडच्या रंगेल प्राध्यापकाला कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. या प्राध्यापकाला कोर्टाने पाच वर्षांच्या कारावासासह आठ हजारांचा दंड ठोठावला आहे.

    बीड: सहकारी प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओ पाठवणाऱ्या बीडच्या रंगेल प्राध्यापकाला कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. या प्राध्यापकाला कोर्टाने पाच वर्षांच्या कारावासासह आठ हजारांचा दंड ठोठावला आहे.

    गजानन करपे अस या गुन्हेगार प्राध्यापकाचे नाव आहे. बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्या शिक्षा ठोठावली आहे. 2017 मध्ये हे प्रकरण घडलं होतं. या प्रकरणातील आरोपी प्राध्यापकाला विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीएम खडसे यांनी पाच वर्ष सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

    गजानन करपे शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात नोकरीला होता. याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेला त्याने व्हॉट्सअॅपवरुन अश्लील व्हिडिओ असलेली लिंक पाठवली होती. या महिलेच्या तक्रारीनंतर नोव्हेंबर 2017 मध्ये घडलेल्या या प्रकारावरुन महाविद्यालय प्रशासनाने करपे याला निलंबित केलं होतं.