कोरोनाच्या भीतीने बीडमध्ये एका वृद्ध माणसाने केली आत्महत्या

बीड: बीड जिल्ह्यामधील ६५ वर्षीय व्यक्तीने कोरोना संक्रमणाच्या भीतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने आज दिलेल्या माहितीनुसार, पटोदा येथील मंगेवाडी येथे ही घटना घडली आहे. आसाराम

बीड: बीड जिल्ह्यामधील ६५ वर्षीय व्यक्तीने कोरोना संक्रमणाच्या भीतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने आज दिलेल्या माहितीनुसार, पटोदा येथील मंगेवाडी येथे ही घटना घडली आहे. आसाराम पोटे असे आत्महत्या करणाऱ्या माणसाचे नाव आहे. पोटे यांनी आपल्या शेतामध्ये एका झाडाला गळफास घेऊन ही आत्महत्या केल्याचे समजते. एका वाटसरुने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. मृताच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पोटे यांचे शव झाडावरून खाली काढण्यात आले.पोटे यांच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. यात त्यांनी कोरोनाच्या भीतीने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच मृत्यूसाठी अन्य कोणाला जबाबदार धरू नये, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.