petrol thrown on girlfriend

तरुणाने गाडी थांबवल्यानंतर प्रेयसीवर ॲसिड हल्ला केला. यानंतर काही वेळाने त्याने तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवले. आरोपी तरुणाने प्रेयसीला ॲसिड आणि पेट्रोल टाकून जाळले आणि तिथून पळ काढला. या घटनेत तरुणी ४८ टक्के गंभीर भाजली आहे. शरीर अर्धवट भाजले गेले. परंतु तिची प्रकृती स्थिर आहे.

बीड : राज्यात दिवाळी (Diwali) सणाची धामधूम सुरु आहे. दिवाळीतही महिलांवरील हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. प्रियकराने (BoyFriend) पुण्याहून बीडमध्ये परतत असताना आपल्या २२ वर्षीय प्रेयसीवर ॲसिड आणि पेट्रोल टाकून (acid and petrol were thrown on his girlfriend) जाळण्याचा ( burnt) प्रयत्न केला. बीडमधील येळंब घाट परिसरात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. तब्बल १२ तास तरुणी रस्त्यालगतच्या खड्ड्यात तडफडत होती.

काय आहे प्रकरण

नांदेडमधील देगलुर तालुक्यातील शेळगाव गावात तरुणी आणि तरुण राहतात. सावित्रा(२२) पिडित तरुणीचे नाव आहे. ती व तिचा प्रियकर ( अविनाश राजुरे) मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ते दोघेजण रात्री बीडकडे दुचाकीवरुन परतत होते. रात्री ३ वाजता घाट परिसररात निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या मांजरसुंबा केज हा मुख्य रस्त्यावरुन जात असताना तरुणाने आपली गाडी थांबवली.

तरुणाने गाडी थांबवल्यानंतर प्रेयसीवर ॲसिड हल्ला केला. यानंतर काही वेळाने त्याने तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवले. आरोपी तरुणाने प्रेयसीला ॲसिड आणि पेट्रोल टाकून जाळले आणि तिथून पळ काढला. या घटनेत तरुणी ४८ टक्के गंभीर भाजली आहे. शरीर अर्धवट भाजले गेले. परंतु तिची प्रकृती स्थिर आहे.

हल्ल्याच्या काही तासांनंतर रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांना तरुणीचा आवाज आला. यामुळे लोकांनी रस्त्यालगतच्या खड्यात पाहिले असता. तरुणी अर्धवट जळलेल्या अवस्थेत होती. घटनास्थळावरच्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले.

धक्कादाय म्हणजे ही तरुणी मध्यरात्री ३ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत रस्त्यालगतच्या खड्ड्यात दुःखात विव्हळत होती. दैव बलवत्तर म्हणून जिवितहानी झाली नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यावर तरुणीला जवळील रुग्णालयात दाखल केले आहे. पिडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर पोलीस स्टेशन के ए.पीय.आय लक्ष्मण केंद्रे घेत आहेत.