कोट्यवधींच्या साखरेचं पावसाने मोठं नुकसान; तब्बल ”इतके” हजार पोते भिजले…

बीडमधील केज तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसात येडेश्वरी साखर कारखान्यातील तब्बल 30 हजार पोते साखर भिजल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. येडेश्वरी कारखान्यातील गोदामामध्ये असलेल्या 30 हजार साखरेच्या गोण्या म्हणजेच तब्बल 15 हजार क्विंटल साखर पावसात भिजून मोठं नुकसान झालं आहे.

    बीड : महाराष्ट्रात सध्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतांना पाहायला मिळत आहेत. त्यातच बीडमधील केज तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसात येडेश्वरी साखर कारखान्यातील तब्बल 30 हजार पोते साखर भिजल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. येडेश्वरी कारखान्यातील गोदामामध्ये असलेल्या 30 हजार साखरेच्या गोण्या म्हणजेच तब्बल 15 हजार क्विंटल साखर पावसात भिजून मोठं नुकसान झालं आहे.

    दरम्यान केजमध्ये फक्त अर्ध्या तासात तब्बल 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जवळपास 50 कामगार गोदामातील पाणी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. येडेश्वरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 हजार साखरेचे पोते पाण्याने भिजले असून हा आकडा 51 हजारांवर जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

    तसेच यंदा केजमधील येडेश्वरी साखर कारखान्याने 06 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून साखर पॅक करून गोदामात ठेवली होती. दरम्यान, मागच्या दोन दिवसात केज तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने 30 हजार होती पावसाच्या पाण्याने भिजल्याने कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.