‘मी या पदावर नाही… त्या पदावर नाही याची फार आठवण काढत नाही’ पंकजा मुंडेंचा टोला

‘सत्तेत नाही याचं दुख नाही. सत्तेत जनता असली पाहिजे. सत्तेच्या खूर्चीवर कोण व्यक्ती आहे याला महत्त्व नाही. त्याची प्रवृत्ती काय याला महत्त्व आहे. मी कोणत्या मंत्रीपदावर नाही याचं मला दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही. मी या पदावर नाही… त्या पदावर नाही… पण माझ्या हातात असतं तर मी केलं असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

    मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काढलं आहे. आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच मला वाटतंय, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर पंकजा यांचं हे विधान आल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

    पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘सत्तेत नाही याचं दुख नाही. सत्तेत जनता असली पाहिजे. सत्तेच्या खूर्चीवर कोण व्यक्ती आहे याला महत्त्व नाही. त्याची प्रवृत्ती काय याला महत्त्व आहे. मी कोणत्या मंत्रीपदावर नाही याचं मला दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही. मी या पदावर नाही… त्या पदावर नाही… पण माझ्या हातात असतं तर मी केलं असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे कारण जनता मला तेवढं प्रेम देत आहे’. याबद्दल पत्रकारांनी पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्या म्हणाल्या की, ‘ही चांगली गोष्ट आहे की, त्यांना आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय. मात्र जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हा शब्द कुणी खेचू शकत नाही’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी यांनी फडणवीस सणसणीत टोला लगावला.

    नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

    “तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही, की मुख्यमंत्री नाही. मला आजही असं वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही. तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिलं नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे” असे फडणवीस म्हणाले.