सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, म्हणत बीडमध्ये भाजपने उघडले मंदिर

सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले मग मंदिर बंद का असा सवाल करत आज बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंखानाद आंदोलन करत बीड जिल्ह्यातील परळी येथील बारा जोतिर्लिंग पैकी 5 व्या स्थानावर असलेले वैधनाथ मंदिर तर बीड येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला.

    बीड : सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले मग मंदिर बंद का असा सवाल करत आज बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंखानाद आंदोलन करत बीड जिल्ह्यातील परळी येथील बारा जोतिर्लिंग पैकी 5 व्या स्थानावर असलेले वैधनाथ मंदिर तर बीड येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला.

    तसेच आज पासून सरकारचे नियम पाळणार नाही आज पासून भक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहील असा निर्णय घेण्यात आला.उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही, असा पवित्रा भारतीय जनता पार्टी च्या वतीने घेण्यात आला.

    दरम्यान राज्य सरकार इकडे बार, हॉटेल चालू करण्यास परवानगी देत असताना मंदिर बंद का?असा प्रश्न उपस्थित करत उद्धवा अजब तुझे सरकार च्या घोषणा देत, मंदिराचे कुलूप उघडून दर्शनासाठी खुले करण्यात आले. सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बोलून दाखवला तसेच सरकार आमच्या श्रद्धेच्या आड येऊ शकत नाही पवित्र श्रावण महिन्यात मंदिर बंद होते आता उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.