इतर जिल्ह्यातून बीडमध्ये येणाऱ्या नागरिकांची होणार अँटिजेन टेस्ट, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी आजपासून करावी असे निर्देश मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

    कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. परंतु, बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियमांत शिथीलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात, तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे. असे बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

    आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी आजपासून करावी असे निर्देश मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

    कोरोना (Covid-19 ) आणि लसीकरणा बाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे पालक मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडेंनी जिल्ह्यातील आरोग्य व प्रशासन यंत्रणांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे. जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शन्स, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व सुसज्जता ठेवण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

    बैठकीमध्ये आढाव्यादरम्यान जिल्ह्यात आठवड्यास 10 हजार लस उपलब्ध होत असल्याचे दिसून आले. जिल्ह्याची क्षमता प्रतिदिन 1 लाख लसीकरणाची असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात लस उपलब्धतेचे प्रमाण वाढावे. यासाठी पालकमंत्र्यांनी बैठकीतून थेट राज्याच्या आरोग्य संचालकांना फोनकरून सूचना दिल्या. यावेळी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी ऑगस्ट महिन्यापासून बीड जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासणार नाही, असे आश्वस्त केले.