परळीतील नगरपरिषदेच्या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

परळी शहराबाहेर असलेल्या नंदागौळ रस्त्यावरील खदान परिसरात नगर परिषदेकडून होणारा कचऱ्याचा साठा परिसरातील नागरीक, वन्यजीव आणि निसर्गाच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे.

    परळी नगरपरिषदेच्या Parli Vaijnath Municipal Council गलथान कारभाराने कळस गाठला असून अवैध कचरा डेपोमुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने संतप्त नागरिकांनी आज पंकजा मुंडे Pankaja Munde यांचेकडे गाऱ्हाणे मांडून सदर विषयात लक्ष देण्याची मागणी केली. नागरिकांच्या या प्रश्नाची तातडीने दखल घेत पंकजा मुंडे यांनी या कचरा डेपोची पाहणी केली. या प्रश्नाकंडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    परळी शहराबाहेर असलेल्या नंदागौळ रस्त्यावरील खदान परिसरात नगर परिषदेकडून होणारा कचऱ्याचा साठा परिसरातील नागरीक, वन्यजीव आणि निसर्गाच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे.

    यासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “नगर परिषदेने ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे विघटन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. परंतु तसे न करता केवळ कागदोपत्री देखावा करून ड्रेनेज लाईन मंजूर करून घेतली. नगर परिषदेच्या या गलथान कारभाराची शहरातील नागरीकांनी तक्रार केल्यानंतर खदान परिसराची पाहणी केली. कचरा डेपोच्या बाजूला वन खात्याची जमीन असल्याने तिथे वन्य जीवांचा संचार असतो. या कचरा डेपोमुळे    नागरिकांचे आणि वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांच्या रक्षणासाठी याविषयात गांभीर्याने लक्ष देणार  असल्याची मी ग्वाही देते.”

    यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ यांचेसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.