परळीत नटराज रंग मंदिरात लस घेण्यासाठी नागरिकांनी केली धक्काबुक्की; शेकडो नागरिक लसी विना परतले घरी

बीड जिल्ह्यच्या परळी येथील नटराज रंगमंदिररात कोविड 19 च्या लसी देणे सुरू आहे . 45 वर्षेंच्या पुढील नागरिकांना याठिकाणी पाहिली व दुसरी लस देण्यासाठी सकाळी 10 पासून सुरुवात करण्यात आली असून दुपारी 1 वाजेपर्यंत 700 लस नागरिकांना देण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

    परळी : बीड जिल्ह्यच्या परळी येथील नटराज रंगमंदिररात कोविड 19 च्या लसी देणे सुरू आहे . 45 वर्षेंच्या पुढील नागरिकांना याठिकाणी पाहिली व दुसरी लस देण्यासाठी सकाळी 10 पासून सुरुवात करण्यात आली असून दुपारी 1 वाजेपर्यंत 700 लस नागरिकांना देण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तर अवघ्या 3 तासातच 700 लसी संपल्या. लस घेण्यासाठी याठिकाणी पुरुषांची एक रंग तर माहिलांची एक रंग अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.

    मात्र या ठिकाणी लस घेण्यास आलेले शेकडो नागरिक लस संपल्या म्हणून वापस ही गेले. या ठिकाणी तुफान गर्दी केल्याचे चित्र पाहवयास मिळाले तर शेवटी काही लसी शिल्लक राहिल्यामुळे लस घेण्यासाठी मात्र नागरिकांची धक्का बुक्की सुद्धा केली तर सामजिक अंतराचा मात्र फज्जा उडाला असल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळाले.

    आरोग्य विभागाने जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी ही नागरिकांतून होत आहे. या गर्दीला अवरण्यासाठी स्थानिक प्रशासन मात्र हतबल झाल्याचे चित्र या वेळी पहावयास मिळाले.