बीड जिल्ह्यात रात्रीपासून संततधार सुरू; जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलाशय ओव्हरफ्लो

ड जिल्ह्यात पुन्हा एकदा रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तर गेल्या आठवडा भरापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे, जिल्ह्यातील सर्वच लघु - मध्यम प्रकल्प, वहात आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारे माजलगाव धरण शंभर टक्के भरले असल्याने, त्याचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

    बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तर गेल्या आठवडा भरापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे, जिल्ह्यातील सर्वच लघु – मध्यम प्रकल्प, वहात आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारे माजलगाव धरण शंभर टक्के भरले असल्याने, त्याचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

    दरम्यान जिल्ह्यातील सर्वात मोठं असणारं माजलगावचं धरण शंभर टक्के भरलं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ऊर्ध्वकुंडलिका मध्यम प्रकल्प, सिंदफणा प्रकल्प, वाण प्रकल्प, मनकर्णिका प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तर धनेगावाचे मांजरा धरण केवळ 51 टक्के भरलेले आहे. तर आठवडा भरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने, लाखो एक्कर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

    परळी अंबाजोगाई मार्गावरील पूल पाण्यात; वाहतूक बंद

    परळीच्या कन्हेरवाडी शिवारात असलेला पूल संपूर्णपणे पाण्यात गेला आहे. परिणामी परळी अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या परळी आणि अंबाजोगाई महामार्गाचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात हा पूल निर्माण करण्यात आला होता. मात्र मुसळधार सुरू असलेल्या पावसाने या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या वतीने परळी आणि अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. वाहतूक बंद केल्यानं नागापूर मार्गे वाहतूक वळविण्यात आली असून कोणीही या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

    तसेचं बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण देखील शंभर टक्के भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.