वीज गेल्याने कोरोना रुग्णाचा व्हेंटिलेटरवर तडफडून मृत्यू

  • बीडमध्ये कोरोना कक्षात लाईट गेल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. यामुळे रुग्णांची मोठी तारांबाळ झाली. तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा तडफडून जागीच मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटन घडली आहे. हा व्हेंटिलेटरवर तडफडताना रुग्णाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

बीड – कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची प्रकरणेही वाढू लागले आहे. परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

बीडमध्ये कोरोना कक्षात लाईट गेल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. यामुळे रुग्णांची मोठी तारांबाळ झाली. तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा तडफडून जागीच मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटन घडली आहे. हा व्हेंटिलेटरवर तडफडताना रुग्णाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओत वीज गेल्यावर रुग्ण तडफडत असताना डॉक्टरांना काही सुचेनासे झाले होते. नातेवाईकच रुग्णालयातील ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृष्य दिसत आहे. ह्या रुग्णाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटरवर रुग्ण असल्यासस दुसरा पर्याय उपलब्ध केला पाहिजे होता. परंतु तसे काहीही घडले नाही. प्रभावी ऑक्सिजनच्या अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा निदर्शनास आला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना य़ा विषयी बोलण्यास नकार दिला आहे.