कोरोनाचं भयाण वास्तव; या शहरात एकाच सरणावर ८ जणांचा अंत्यविधी

सहा सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आठ मृतांचा अंत्यविधी मांडवा रोडवर असलेल्या नगर परिषदच्या स्मशानभूमीत एकाच सरणावर केला. कोरोना मृतांची विल्हेवाट लावणे हे देखील अंबाजोगाई नगरपालिकेला डोके दुखीचा विषय बनला आहे.

    अंबाजोगाई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात असले तरी, कोरोना अटोक्यात येत नाही, ही प्रशासनापुढे चिंतेची बाब ठरली आहे. दरम्यांन अंबाजोगाई येथील सरस्वती कोविड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्या आठ जणांना एकाचं सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ येथील नगरपालिकेवर आहे.

    अंबाजोगाई तालुक्यात चार दिवसात पाचशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. मात्र, काही नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी शहरातील मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या आठ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला.

    एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग

    या आठ रुग्णांवर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील पालिकने निर्माण केलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला. यामध्ये एक महिला असून सर्व रुग्ण ६० वर्षापुढील आहेत. सहा सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आठ मृतांचा अंत्यविधी मांडवा रोडवर असलेल्या नगर परिषदच्या स्मशानभूमीत एकाच सरणावर केला. कोरोना मृतांची विल्हेवाट लावणे हे देखील अंबाजोगाई नगरपालिकेला डोके दुखीचा विषय बनला आहे.