बीड जिल्ह्यातील कारागृहात ५९ कैद्यांना कोरोनाची लागण, प्रशासनाच्या चिंतेत वाढ

बीडमध्ये कारागृहातील कैदी कोरोनाबाधित आढळल्याने सर्व पोलिसांची, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने कैदी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच पोलीस प्रशासनही हादले आहे.

बीड : बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाबाधितांची संख्याही जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कारागृहात असणाऱ्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे प्रशासनाची मोठी चिंता वाढली आहे. कोरोनाने आता थेट कारागृहात शिरकाव केला आहे. बीड जिल्ह्यातील कारागृहात ५९ कैदी कोरोनाबाधित आढळले आहेत.

बीडमध्ये कारागृहातील कैदी कोरोनाबाधित आढळल्याने सर्व पोलिसांची, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने कैदी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच पोलीस प्रशासनही हादले आहे.

बीड जिल्ह्यात मागील २४ तासात १२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कोरोनाबाधित ५९ कैद्यांचा देखील समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९५४ झाली असून यामधील २०५१ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ९९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.