marriage fraud

बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे आजोकांच्या चांगलच अंगलट आले आहे. आयोजकासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    बीड : बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे आजोकांच्या चांगलच अंगलट आले आहे. आयोजकासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला आमदार खासदारांनीही हजेरी लावली. अनेक जोडप्यांचा सामूहिक विवाह या ठिकाणी करण्यात आला. मात्र, या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला.

    याची गांभीर्याने दखल घेत माजलगाव पोलीस ठाण्यात आयोजकासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून थेट कारवाई केली जात आहे.